Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या सुमारास घरातून थेट तरुणाने गाठली विहीर अन घडले ते धक्कादायक !
    क्राईम

    रात्रीच्या सुमारास घरातून थेट तरुणाने गाठली विहीर अन घडले ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskNovember 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात तरूणासह तरुणी आपल्या जीवनयात्रा संपवीत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतान एक धक्कादायक घटना पुण्यातील बाणेर येथून समोर आली आहे. कळमकर चौकामधील विहिरीत एका तरुणाने उडी मारून आपलं जीवन संपलंय. स्वप्निल राऊत असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.

    या आत्महत्येमागे मानसिक आजार आणि घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे.स्वप्नील मूळचा बुलढाणा जिल्ह्याचा आहे. रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे झोपल्यावर या तरुणाने घरातून थेट विहीर गाठली आणि उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मंडळींना तरुण दिसला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे विहिरी शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्यात आले.

    त्यावेळी तरुणाने स्वतः विहिरीत उडी मारल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. फुटेज पाहिल्यावर कुटुंबियांनी धावपळ करत विहिरीजवळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. युवकाचे वडील आणि भाऊ शेजारी असलेल्या सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. स्वप्नील हिंजवडीमधील एका लहान कंपनीमध्ये कामाला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याला मानसिक त्रास होत होता. त्याचबरोबर त्याच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणे व्हायची. यातूनच या तरुणाने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.