Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी करणारे चौघे अटकेत !
    Uncategorized

    रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी करणारे चौघे अटकेत !

    editor deskBy editor deskOctober 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिव कॉलनी येथे बंद कराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले अम्प्लिफायर व साऊंड सिस्टम असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या चार चोरट्यांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरातील रहिवासी प्रदीप सुदाम वाणी यांचे शिव कॉलनी परिसरात घरात त्यांनी त्यांच्या मालकीचे अॅम्प्लिफायर व साऊंड सिस्टम मुद्दे ठेवण्यात असा एकूण आला होता. दरम्यान २९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी साऊंड सिस्टिम व अपलिफायर असा एकूण १ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्ह्यातील आरोपींच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने संशयित आरोपी सागर राजाराम गवळी (वय २९, रा. पिंप्राळा हुडको), अबार अमित खाटीक ( वय १८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय २२) आणि अमोल प्रकाश शिरसाठ (वय २५) रा. दूध फेडरेशन हुडको या चौघांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    यांनी केली कारवाई 

    पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोली अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावि आणि पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळस्कर, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, उमेश पवार आणि रवींद्र चौधरी यांनी कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026

    प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.