Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खरेदी-विक्रीची गुंतवणूक पडली महागात ; ९० लाखात झाली फसवणूक !
    क्राईम

    खरेदी-विक्रीची गुंतवणूक पडली महागात ; ९० लाखात झाली फसवणूक !

    editor deskBy editor deskOctober 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

     

    जमीन खरेदी-विक्रीत गुंतवणूक करणे एका चांगलेच महागात पडले आहे. दाम्पत्याने एकास तब्बल ९० लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला असून, खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने गुंतवणूकदाराने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पद्माकर घुमरे व सुनीता घुमरे – भंडारे असे या व्यवहारात गंडा घालणाऱ्या संशयित दाम्पत्याचे नाव आहे. जेम्स प्रसाद वरसाला ( वय३६, रा. आनंदनगर, नाशिकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार वरसाला व घुमरे दाम्पत्य एकमेकांचे परिचीत असून, त्यांच्यात सन २०१४ मध्ये हा व्यवहार झाला होता. घुमरे दाम्पत्याने वरसाला यांचा विश्वास संपादन करून वाडीव-हेजवळील अकरा एकर जमीन खरेदी करून देतो, अशी बतावणी केली होती. त्यानुसार जमीन पसंतीनंतर ९० लाख रुपयांची रोकड बँकेतून काढून देत अदा करण्यात आली. मात्र, नऊ वर्षे उलटूनही संबंधितांनी जमिनीची खरेदी करून दिली नाही. या व्यवहारापोटी दिलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने वरसाला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली होती. त्यानंतर हा गुन्हा गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक नरेंद्र बैसाणे करीत आहेत.

    #police Crime Fraud nashik
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.