Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के !
    राष्ट्रीय

    दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के !

    editor deskBy editor deskOctober 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भूकंपाच्या धक्क्याने हादरुन गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी होती. ज्याचे केंद्र नेपाळमध्ये होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लखनौ, उत्तराखंड आणि नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले की, दुपारी २.५१ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या भुकंपात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. डेहराडून, उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये लोक इमारतींमधून बाहेर धावले आणि बाहेर गर्दी दिसून आली. घरातील पंखे, फर्निचर थरथरायला लागले आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, या भूकंपामध्ये जिवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत असून याबाबतची माहिती गोळा केली जात आहे.

    bhukamp Dilli NCR
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.