Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शुल्लक कारणाने मुलाने केला आईवर प्राणघातक हल्ला 
    क्राईम

    शुल्लक कारणाने मुलाने केला आईवर प्राणघातक हल्ला 

    editor deskBy editor deskSeptember 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

     

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतांना यात नाशिक शहराचा देखील नंबर लागू लागला आहे. नुकतेच उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर झोपडपट्टीत पैशांसाठी मुलाने आईवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने आई जखमी झाली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मुलाविरूध्द खूनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण परशुराम गालट (२८ रा.क्रांतीनगर,झोपडपट्टी उंटवाडीरोड) असे आपल्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी काजल आसरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या हल्यात जानकी परशुराम गालट (४५) या जखमी झाल्या आहेत. गालट मायलेकामध्ये गुरूवारी (दि.२८) सायंकाळी पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. आईने पैसे दिले नाही या कारणातून संतप्त मुलाने आपल्या आईला शिवीगाळ करीत तुला जीवंत सोडत नाही असे म्हणून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत जानकी गालट ही महिला गंभीर जखमी झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.

    #police Crime nashik
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.