Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शुल्लक कारणाने जळगावात धारदार शस्त्राने वार !
    क्राईम

    शुल्लक कारणाने जळगावात धारदार शस्त्राने वार !

    editor deskBy editor deskSeptember 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    विजेची वायर कट केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेसह दीराला मारहाण करुन धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील समता नगरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात राणी सलीम शेख (वय ३०) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घराची वीजेची वायर कट केल्याचे विद्यूत प्रवाह खंडीत झाला होत. त्यावेळी राणी शेख यांचा दीर तन्वीर शेख हा घराबाहेर आला. त्यावेळी संशयित अनवर शेखइब्राहिम शेख याच्यासह इतर दोन ते तीन जण बसलेले होते. तन्वीर शेख म्हणाला की, कुणीतरी विजेची वायर कट केली. असे बोलल्याचा राग आल्याने अनवर शेख इब्राहिम शेख याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी राणी सलीम शेख ह्या मध्यस्थी करण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील मारहाण केली व चाकूसारख्या वस्तूने मारून हाताला दुखापत केली. दरम्यान महिलेने रामानंदनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अनवर शेख इब्राहिम शेख रा. समता नगर, जळगाव याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश पाटील करीत आहेत.

    #crime #updates #jalgov #police #jalgaon Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.