Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोबाईलच्या स्फोटाने नाशिक हादरले : तीन जखमी !
    क्राईम

    मोबाईलच्या स्फोटाने नाशिक हादरले : तीन जखमी !

    editor deskBy editor deskSeptember 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

     

    नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या उत्तमनगर मध्ये मोबाईलचा भीषण स्फोट होवून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. शहरातील उत्तमनगर परिसरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या स्फोटामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुषार जगताप, बाळकृष्ण सुतार आणि शोभा जगताप अशी जखमींची नावे आहेत. हा मोबाईल स्फोट इतका भीषण होता की घराचे मोठे नुकसान झाले असून स्फोट झालेल्या घराच्या काचांसह आजूबाजूच्या काचाही फुटल्या. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. स्फोट कसा झाला याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरातील नागरिंकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

    Mobile sfot nashik
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.