Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रक्षक बनला भक्षक ? पोलिसाची केली नागरिकांनी धुलाई ; पहा व्हिडीओ !
    क्राईम

    रक्षक बनला भक्षक ? पोलिसाची केली नागरिकांनी धुलाई ; पहा व्हिडीओ !

    editor deskBy editor deskSeptember 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करता याव, व कायदा कोणी मोडू नये, याकडे लक्ष देणं हे खरंतर पोलिसाचं काम असतं. कायदा मोडणाऱ्यांना वठणीवर आणणं हे देखील त्यांचं कर्तव्य असतं. पण हा रक्षकच भक्षक बनला तर ? कायद्याचं पालन करण्यास शिकवणाऱ्याने तो तोडून लोकांना त्रास दिल्याची एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. एका मुलीची विनयभंग करणाऱ्या पोलिसाची नागरिकांनीच चांगलीच धुलाई केली असून त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी त्या पोलिसाचे कपडे काढून त्याला खांबाला बांधत त्याला बेदम चोप दिला.
    एवढेच नव्हे तर त्यानंतर नागरिकांनी तेथील स्थानिक पोलिसांना या घटनेची सूचना दिली आणि घडलेला प्रकार कथन केला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी पोलिसाला अटक केली व घेऊन गेले. आग्रा येथे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. संदीप असे आरोपी इन्स्पेक्टरचे नाव आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार संदीपला तत्काळ निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू आहे. एत्मादपूर पोलीस स्टेशन बरहन परिसरात ही घटना घडली.

    आगरा: बरहन के तिहइया गांव के एक घर में आपत्तिजनक स्थिति में पकड़ गया दारोगा। ग्रामीणों ने दारोगा को नंगा करके खंभे से बांधा। पिटाई भी की।
    नोट:- वीडियो के ऑडियो में अभद्र भाषा हो सकती है। pic.twitter.com/l5NGH5KAUv

    — Shivam Yadav (@Shivam28Y1) September 17, 2023

    रविवारी रात्री उशीराच्या सुमारास पोलिस असलेला संदीप हा एका गावकऱ्याच्या घरात घुसला होता. आणि त्याने घरातील मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे. त्याच्या या कृतीमुळे पीडित मुलीने जोरात ओरडायला सुरूवात केली. तिचा आवाज ऐकून कुटुंबिय तिच्या खोलीत आले आणि त्यांनी आरोपी पोलिसाला पकडले. आरोपी पोलिस अधिकारी हा बरहन ठाण्यात कार्यरत आहे. त्याला खांबाला बांधून मारहाणा करण्यात आल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्या पोलिस अधिकाऱ्याला एका खांबाला बांधण्यात आले असून त्याच्या अंगावर अंतर्वस्त्राशिवाय कपडे नाहीत, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही लोकांनी त्याला मारहाणही केली. मात्र स्थानिक पोलिस तेथे पोहोचले आणि आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन संतप्त नागरिकांना दिले. आरोपी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

    #police Crime Uttrakhand
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.