मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तब्बल ३९ जण गंभीर जखमी झाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ३९ जण जखमी झाले असून इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



