Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात डेंग्यू सदृश्य रुग्ण तरुणाचा मृत्यू !
    जळगाव

    जळगावात डेंग्यू सदृश्य रुग्ण तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskSeptember 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    जळगाव शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यू सदृश्य आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगावपासुन जवळच असलेल्या शिरसोली गावात देखील डेंग्युने थैमान घातले असून, एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे. याशिवाय गावात डेंग्यू पॉझिटिव्ह आणखी रुग्ण आहेत.

    जळगाव शिरसोली प्र. वो. येथील बारी नगरात तालुक्यातील देवेंद्र बारी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे देवेंद्र बारी याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघून आई-वडिलांसह बहिणींनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. वडीलांना इलेक्ट्रीक कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. दरम्यान, गावकर्‍यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप होत आहे. मयत तरुण राहत असलेल्या परीसरात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे देवेंद्रला डेंग्यू झाल्याचा आरोप आहे.

    boy died degyu Hospital
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.