Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बोलेरो गाडी न दिल्याने जावयाने बनविला पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ !
    क्राईम

    बोलेरो गाडी न दिल्याने जावयाने बनविला पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ !

    editor deskBy editor deskSeptember 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

     

    देशभरात सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही खरे असतात तर काही खोटे असतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. थेट नागरिकांनी त्या जावयाला चोप देण्याची भाषा केली आहे. सासरच्या लोकांकडे जावायाने बोलेरो गाडी मागितली होती. त्यावेळी सासरच्या लोकांनी गाडी देण्यास नकार दिला, त्यावेळी जावयाने पत्नीला जोराची मारहाण केली, त्याचबरोबर पत्नीचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ माहेरच्या लोकांना पाठवून दिला आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले असल्याचे सु्ध्दा त्यांनी सांगितले आहेत. त्या महिलेवरती रेप करण्यासाठी पुतण्या आणि इतर घरच्यांना सुध्दा पाठवलं होतं असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. दहा लोकांच्या विरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे.,

    त्याचबरोबर हा प्रकार बरेलीच्या इज्जतनगर थाना क्षेत्रात येत आहे. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे, सध्या सगळे आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांना शोधण्यात व्यस्त आहेत. ज्या महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे, तिचं लग्न फेब्रुवारी महिन्यात झालं होतं. त्यानंतर ती तिच्या सासरी गेली होती. तेव्हापासून पती सासरच्या लोकांकडे बोलेरो गाडी मागत होता. ज्यावेळी महिलेच्या घरच्यांनी गाडी देण्यास नकार दिला, त्यावेळी सासरच्या लोकांनी तिच्याकडे असलेले सगळे सोने काढून घेतले होते. ज्यावेळी त्या महिलेने हे सगळं देण्यास नकार दिला, त्यावेळी सासरच्या लोकांनी तिला जब्बर मारहाण केली होती. महिलेने दिलेल्या माहितीनुसार दोन लोकांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर पतीने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ तयार करुन माहेरच्या लोकांना पाठवला आहे. त्याचबरोबर अशी धमकी दिली आहे की, माझी मागणी पूर्ण झाली नाही तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपीने या गोष्टी सुध्दा केल्या आहेत. एक दिवस महिलेच्या जेवणात त्यांनी विष सुध्दा टाकलं होतं. ज्यावेळी त्या महिलेला जेवणात विष असल्याची माहिती झाली, त्यावेळी त्या महिलेने जेवण फेकून दिलं होतं, ज्या मांजरीने ते जेवणं खाल्लं तिचा मृत्यू झाला होता. परेशान असलेल्या महिलेने पोलिस स्टेशन गाठलं आणि झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. पोलिस आरोपींच्या शोधात आहे.

    #police Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.