Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नीला आणले रुग्णालयात प्रसुतीसाठी अन बाहेर आल ते धक्कादायक कारण !
    क्राईम

    पत्नीला आणले रुग्णालयात प्रसुतीसाठी अन बाहेर आल ते धक्कादायक कारण !

    editor deskBy editor deskAugust 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

     

    राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह महिलावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना राज्यात उघडकीस आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका पतीने पत्नीला प्रसुतीसाठी आणले. त्यानंतर डॉक्टरांना एक धक्कादायक बाब समजली. हा सर्व प्रकार डॉक्टरांनी पोलिसांना सांगितला. त्याची तत्काळ दखल घेत पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. हि घटना नाशिक शहरात घडली आहे.

     

    अल्पवयीन असतांनाही तिला मातृत्व लादल्याप्रकरणी थेट पती विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या विवाहीतेच्या कागदपत्र पडताळणीत बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश मगरे (रा.शरणपूर) असे संशयित पतीचे नाव आहे. पीडिता अल्पवयीन असतांनाही तिचा गेल्या वर्षी संशयिताशी विवाह पार पडला. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्याने हा बालविवाहाचा प्रकार समोर आला आहे. विवाहानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला असून तिच्या कागदपत्र पडताळणीत अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने थेट पती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

    #police Crime nashik
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.