Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात खळबळ : फौजदाराने घेतली १५ हजाराची लाच !
    क्राईम

    जिल्ह्यात खळबळ : फौजदाराने घेतली १५ हजाराची लाच !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. चोपडा शहरातील बसस्थसानक परीसरात शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

    शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील ३२ वर्षीय तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्रांना 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता तीन पोलिसांनी सत्रासेन रस्त्यावर दुचाकीवरून पकडले होते. पोलीस ठाण्यात चला, तुमच्यावर गांजाची कारवाई करायची आहे, अशी दमदाटी करून आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत आरोपी पोलिसांनी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून पहाटेच्या सुमारास 30 हजार रुपये उकळले व तरुणांची दुचाकी ठेवून घेतली तसेच दुचाकी सोडवायची असेल तर 20 हजार रुपये लागतील, अशी मागणी 24 रोजी संशयित शिवाजी बाविस्कर केली व 15 हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी 25 रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे 15 हजारांची लाच रक्कम आणल्यानंतर चोपडा शहरातील बसस्थानकाजवळ संशयित चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर आल्यानंतर त्यास लाच दिली व पथकाला लाच दिल्याचा इशारा करताच पथकाने संशयितावर झडप घालून त्यास अटक केली. संशयिताविरोधात चोपडा शहर पोलिसात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

    जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, बाळु मराठे, राकेश दुसाणे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.