Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » युवासेनेच्या भव्य रक्तदान शिबीरात 118 रक्तपिशव्या संकलीत
    आरोग्य

    युवासेनेच्या भव्य रक्तदान शिबीरात 118 रक्तपिशव्या संकलीत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 17, 2021Updated:November 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त काव्यरत्नावली चौक जळगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन युवासेनेतर्फे करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. शिबीराला प्रथम रक्तदाते म्हणून गुणवंत सोनवणे यांनी रक्तदान केले. यानंतर एकूण 118 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून बाळासाहेंबांना अभिवादन केले.

    यावेळी महापौर जयश्री महाजन व माजी महापौर नितिन लढ्ढा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, नगरसेवक नितिन बरडे, सरिता माळी-कोल्हे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विकास पाटील, अतुल चौधरीउपजिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, समन्वयक जितेंद्र बारी , युवासेना महानगर युवा अधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर युवाधिकारी यश सपकाळे, गिरीष सपकाळे, सागर हिवराळे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, उपतालुकाप्रमुख अतुल घुगे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड, राकेश चौधरी, निलेश वाघ, आकाश पाटील, अनिल पाटील, महेश सानप, विभाग युवाधिकारी तेजस दुसाने, चेतन कापसे व समस्त युवासैनिक उपस्थित होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढी यांचे जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, डॉ. शंकरलाल सोनवणे, सिमा शिंदे, उमाकांत शिंपी यांचे विशेष सहकार्य लाभले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, राहूल ठाकूर, पवन चव्हाण, मयूर जाधव, परेश चोपडा, सागर सोनवणे, पियुष हसवाल, भुषण सोनवणे, संदिप सुर्यवंशी, इत्यादींनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.