Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दारूड्या दुचाकीस्वराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू
    क्राईम

    दारूड्या दुचाकीस्वराच्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गर्भवती महिला दोन्ही नणंदा सह रस्त्यावर शतपावली करीत असताना दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वावडदा येथे घडली असून संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे.

    या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. इतक्यात सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत दुचाकीस्वार हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले.

    दरम्यान, आज सकाळी ज्योती गोपाळ हीचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. संबंधीत दोषी मोटाल सायकल स्वारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला असून यामुळे तणावाचे वातावरण निर्मित झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.