Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी ‘हा’ दिला मुलांना सल्ला !
    राष्ट्रीय

    कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी ‘हा’ दिला मुलांना सल्ला !

    editor deskBy editor deskAugust 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    राज्याला हादरवून टाकणारी घटना गेल्या काही दिवसापूर्वी घडली होती. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूमुळे मनोरंजन सृष्टी अनेकांना याच मोठा शॉक लागला होता. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का होता, ते तर अक्षरश: कोसळले. गेली अनेक दशके मराठी, हिंदींतील विविध चित्रपटांचे भव्यदिव्य सेट उभारणाऱ्या नितीन देसाई यांना अनेक महत्वपूर्ण पुरस्कार मिळाले होते.

     

    मुंबईत राहून एन.डी.स्टुडिओचे कामकाज सांभाळायचे तर त्यांची मुलं परदेशात होती. आयुष्यात हेच कर आणि तेच कर असं नितीन देसाई यांनी कधीच त्यांच्या मुलांना सांगितलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला नाही. त्यांची छोटी मुलगी तन्वी ही फॅशन डिजायनिंगचे शिक्षण घेत असून 12 नंतर ती पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील अभ्यासासाठी ती अमेरिकत गेली आणि शिकता-शिकता ती तिचे कामही सांभाळत आहे.

     

    काही महिन्यांपूर्वी नितीन देसाई यांनी त्यांची लेक मानसी हिचे तिचा बॉयफ्रेंड जॉर्डनसोबत धूमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. त्यांच्या जवळच्या लोकांच्या सांगण्यानुसार, मुलांनी आपली बिझनेसमध्ये मदत करावी, यासाठी नितीन देसाई यांनी त्यांच्या मुलांवर कधीच दबाव टाकला नाही. तुमचं आयुष्य एन्जॉय करा, खूप शिका, मी आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असां त्यांनी मुलांना सांगितलं होतं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम करत राहीन, पण तुम्ही जे ज्ञान मिळवाल त्याचा स्वत:साठी आणि समाजासाठीही उपयोग करा, असा सल्लाही नितीन यांनी त्यांच्या मुलांना दिला होता.

    advice Nitin desai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.