Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांचा फोन वाजला अन मुंबई हल्याची धमकी !
    राज्य

    पोलिसांचा फोन वाजला अन मुंबई हल्याची धमकी !

    editor deskBy editor deskAugust 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने फोनवरून दिल्याने मुंबई पोलीस दक्ष झाले असून याचा पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आहे. विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

    मुंबई पोलिसांनी ‘एनएनआय’ला सांगितलं की, “पोलीस नियंत्र कक्षाला एका व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. ‘मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत. विलेपार्ले परिसरातून बोलत आहे,’ असं त्या व्यक्तीने म्हटलं. नंतर या व्यक्तीने फोन बंद केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.” दरम्यान, एटीएसने पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असताना दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडले आहे. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण यालादेखील अटक केली आहे. तसेच, दोघांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या अभियंता सिमाब काझी याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.

    bomb blast Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.