Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मणीपुरात आग भडकली जमावाने केला पोलीस स्थानकावर हल्ला !
    राष्ट्रीय

    मणीपुरात आग भडकली जमावाने केला पोलीस स्थानकावर हल्ला !

    editor deskBy editor deskAugust 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी 4 ऑगस्ट रात्री मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली आहे.

    मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा एक जवानही शहीद झाला, असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. एवढंच नाही तर जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. जमावानं 235 असॉल्ट रायफल, 21 सब-मशीन गन, 16 पिस्तूल, 9,000 गोळ्या आणि 124 हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी कुकी गट, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम ने हिंसाचारात बळी पडलेल्या 35 जणांच्या मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याची घोषणा केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे.
    3 ऑगस्ट रोजी दुसर्‍या घटनेत बिष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुगकचाओ युनिटमध्ये शेकडो लोक जमले होते. यानंतर हल्लेखोरांना हाताळण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये 347 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मणिपूरमधील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

    #manipur #police aag
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.