Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोहसीन खान यांना “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर
    धरणगाव

    मोहसीन खान यांना “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 8, 2021Updated:November 9, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१” साठी निवड करण्यात आली आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील नामांकित आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे ह्यावर्षी दिला जाणारा “खान्देश भूषण पुरस्कार” व मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, कर्जोद ता. रावेर जि. जळगाव यांच्या तर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” साठी धरणगाव येथील जि.प. उर्दू प्रा. शाळा क्र. ०१ च्या मोहसीन खान अजीज खान यांची निवड करण्यात आली आहे. पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज तसेच ऑनलाइन अर्ज आणि विश्वसनीय मान्यवरांनी सुचवलेल्या नावांची छाननी करून ही निवड करण्यात आली आहे. निवड करतांना शैक्षणिक क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कार्य तसेच त्यांनी राबविलेल्या विविधांगी उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि. १४ नोव्हेंबर २०२१ वार – रविवार रोजी सकाळी १०:३० वाजता कर्जोद ता. रावेर जि. जळगाव येथे “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” चा वितरण सोहळा संपन्न होणार आहे तसेच दि. २८ नोव्हेंबर २०२१ वार – रविवार रोजी स. ११ ते दु. ३ दरम्यान अल्पबचत भवन जळगाव येथे “खान्देश भूषण पुरस्कार – २०२१” चा वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.