Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव यांनी मुक्ताईस भाऊबीजेची साडीचोळी दिली भेट
    जळगाव

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव यांनी मुक्ताईस भाऊबीजेची साडीचोळी दिली भेट

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email





    आपेगाव व मुक्ताईनगर दोन्ही संस्थानने जपली  परंपरा

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दरवर्षी प्रमाणे भाऊबीजेला बहिणीसाठी भावाने साळी भेट देत असतात त्याप्रमाणे बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज श्री क्षेत्र आपेगाव संस्थान यांच्याकडील साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर अभिषेक पूजनाने संत मुक्ताबाईस परिधान करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊबीज उत्सवाला पहाटे मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती.

    भाऊबीजेच्या दिवशी संत मुक्ताबाईला साडी चोळी परिधान करण्यात येते या भाऊबीज उत्सवास साक्षीदार होण्यासाठी पहाटेच भाविकांची मांदियाळी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवे मंदिर येथे जमली होती. ह्यावेळी संत मुक्ताबाई रविंद्र हरणे महाराज यांच्यासह जिजाभाऊ मिसाळ यांनी सहपत्निक संत मुक्ताईची पंचामृताने अभिषेक पुजा आरती केली. यावेळी कार्यक्रमाला मुक्ताई संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील, आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, किशोर खोडपे, ईश्वर रहाणे, विवेक कुमावत, ईश्वर चोरडिया, एकनाथ नरके,दिलीप राव लांडगे,राम पाटील आऊटे, भाऊसाहेब आउटे, लक्ष्मणराव आऊटे,माऊली मूळे,पंडित राव आऊटे,राजेंद्र वाघ,तात्यासाहेब मोरे,ज्ञानेश्वर मिसाळ,मनोहर थोरात,विठ्ठल नरके,संकेत मिसाळ, नवपुते महाराज,सतीश महाराज,योगेश सोन्ने.तसेच मुक्ताई व आपेगाव येथील संस्थानचे विश्वस्त व भाविक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.