Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव : तलवार, कट्टा, पिस्तूलासह फोटो काढणे पडले महागात !
    क्राईम

    चाळीसगाव : तलवार, कट्टा, पिस्तूलासह फोटो काढणे पडले महागात !

    editor deskBy editor deskJuly 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहरात तलवार, कट्टा,पिस्तूलासह फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करुन समाजात दहशत निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळील दोन तलवार, एक चॉपर पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी शहर पोलिस ठाण्याचे आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे यांना गोपनीय खबर मिळाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यासीन नगर भागात काही मुले हातात तलवार व चॉपर घेऊन दहशत माजवत आहेत. तसेच हत्यारासह फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारीत करीत आहेत, अशी माहिती समजली. यावरून पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्यांच्यासोबत पोलिस नाईक राहुल सोनवणे, महेद्र पाटील, भूषण पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, पवन पाटील यांच्या पथकाने संशयित मोईन अशपाक खाटीक (१९) नाजीम नजमुद्दीन खाटीक (१९), तबरेज तौकीर खाटीक (२४) व अन्य एक (सबस्टेशन जवळ, यासीन नगर, हिरापूररोड, चाळीसगाव), आयान दयान खाटीक ( २०, त्रिमूर्ती बेकरीच्या समोर, हुडको कॉलनी) यांना अटक केली. या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.