Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात चार दिवस चालणार मुसळधार पाऊस !
    कृषी

    राज्यात चार दिवस चालणार मुसळधार पाऊस !

    editor deskBy editor deskJuly 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    सोमवारपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह मुंबई, ठाणे भागात चांगला पाऊस पडतो आहे. नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरसंच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागांसह ठाणे आणि सातारा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    गडचिरोली जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळं आलपल्ली- भामरागड मार्ग बंद झाला आहे तर काही छोट्या नाल्यांना पूर आल्याने इतर सात छोटे मार्ग बंद. जिल्ह्यात एकूण आठ मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली भागात पाऊसाचा जोर अधिक आल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातही गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीला पूर आला असून ती सध्या पात्राबाहेर ओसंडून वाहते आहे. नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना प्रशासनातर्फे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस रायगड, रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.