Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज ठाकरे दौऱ्यावर ; तडजोड करणार नाहीच !
    राजकारण

    राज ठाकरे दौऱ्यावर ; तडजोड करणार नाहीच !

    editor deskBy editor deskJuly 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्याच्या राजकारणात शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना आता त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे देखील बाहेर पडले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे. आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून आज चिपळूणमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

    येत्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यामध्ये जो व्यभिचार सुरु आहे तो मी कधीही करणार नाही. तडजोड करावी लागली तर घरात बसेन परंतु तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर ते पुढे खेड, दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांची उपस्थिती आहे.

    पदाधिकाऱ्ऱ्यांशी संवाद साधतांना राज ठाकरे म्हणाले की, पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही. आपण आपला विचार पोहोचवण्याची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी पदांनी एकमेकांशी बोलण्याऐवजी मनांनी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. सत्तापक्षाच्या वतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं प्रत्येक जिल्ह्यात आयोजन केलं जात आहे. एकूणच २०२४ लोकसभा, विधानसभा आणि संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांचीच पक्षबांधणी जोमात सुरु असल्याचं दिसून येतंय.

    #mns #rajthaakre.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.