Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री अब्दुल सत्तारांची हक्कालपट्टी करा ; नागरिकांचे आंदोलन !
    राजकारण

    मंत्री अब्दुल सत्तारांची हक्कालपट्टी करा ; नागरिकांचे आंदोलन !

    editor deskBy editor deskJuly 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था 

    राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील विविध तक्रारदार, अन्यायग्रस्त, पिडीत आणि त्रस्त नागरिकांनी छत्रपती संभाजी नगर क्रांती चौक येथे आंदोलन  केले. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी देखील मागणी केली आहे.

    शिंदे गटातील आमदार कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महेश शंकरलाल शंकरपेल्ली, गजानन अप्पाराव गोराडे, आशाबाई धोंडू बोराडे, तय्यब बडे मियाखां पठाण, मुक्तार सतार बागवान, शकील साहेबखां पठाण, कृष्णा कडूबा कापसे, संजय माणिकराव निकम, भगवान सुखदेव जीवरग, सुनील प्रभाकर मिरकर, मनोज गंगाराम मोरेल्लु, कमलेश गोविंदराम कटारिया, विष्णू गंगाराम काटकर इत्यादी जवळपास 60 ते 70 लोकांनी अब्दुल सत्तार यांच्या विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला वाचा फोडत आज तीव्र आंदोलन केले.
    दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषीमंत्री सत्तार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी प्रतिकिया दिली आहे. अब्दुल सत्तार मंत्री झाल्यापासून त्यांनी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु केला आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा. गोरगरीब यांच्या जमिनी हडपणे, वाळू तस्करी करणे, जमीन न दिल्यास बळजबरीने जमीन हडपण्याचे काम सत्तार यांनी केला असल्याचा आरोप यावळी करण्यात आला. तसेच राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा कोणी मंत्री असेल तर ते अब्दुल सत्तार आहेत असा आरोप देखील आंदोलकांनी यावेळी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.