Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवारांच्या दोन मंत्र्यांनी मारण्याची धमकी ; ५० लाखांची केली मागणी !
    राजकारण

    अजित पवारांच्या दोन मंत्र्यांनी मारण्याची धमकी ; ५० लाखांची केली मागणी !

    editor deskBy editor deskJuly 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेत असतानाच या सरकारमधील दोन दिग्गज मंत्र्यांनी  फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणात एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे . पहिला फोन मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला होता याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील परळी या गावाच्या निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी देखील केली आहे.

    राज्यात सत्ता संघर्षादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना धमकी आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्येच सामील झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनाही धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. प्रशांत पाटील (मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात पाटील याने संपर्क साधला होता. त्याने भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याची धमकी दिली होती. भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याला धमकी देणारा दूरध्वनी करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. भुजबळ सोमवारी (१० जुलै ) पुण्यात आले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.