Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुलै महिन्याच्या सुरुवातीस ‘हे’ होणार मोठे बदल !
    राजकारण

    जुलै महिन्याच्या सुरुवातीस ‘हे’ होणार मोठे बदल !

    editor deskBy editor deskJune 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    येत्या तीन दिवसात जुलै महिना सुरु होत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. सुरुवातीपासूनच अनेक गोष्टी बदलण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेबरोबरच यावेळीही काही बदल अपेक्षित आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर ते सीएनजी-पीएनजीच्या किमतींचा समावेश आहे.

    तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला दरात बदल करत असतात. एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यावेळी व्यावसायिक सोबतच १४ किलो एलपीजी सिलिंडरचे दरही कमी होण्याची शक्यता आहे. १ जुलै २०२३ पासून परदेशात क्रेडिट कार्डच्या खर्चावर TCS शुल्क आकारण्याची तरतूद असू शकते. या अंतर्गत, जर तुमचा खर्च ७ लाख किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला २० टक्के TCS भरावा लागेल. शिक्षण आणि औषधोपचाराशी संबंधित खर्चावर ही फी ५ टक्के करण्यात येणार आहे. परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या करदात्यांना ७ लाखांपेक्षा जास्त रकमेवर ०.५ टक्के टीसीएस फी भरावी लागेल.

    सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीतील बदल महिन्याच्या १ तारखेला किंवा एलपीजीप्रमाणे पहिल्या आठवड्यात दिसून येतात. दिल्ली, मुंबई आणि इतर शहरातील तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सीएनजी-पीएनजीचे दर बदलतात. आता जुलैमध्ये किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.