Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उद्योजकाने उचलले मोठे पाऊल ; मुलासह पत्नीला विष देत कापला स्वतचा गळा !
    क्राईम

    उद्योजकाने उचलले मोठे पाऊल ; मुलासह पत्नीला विष देत कापला स्वतचा गळा !

    editor deskBy editor deskJune 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था 

    येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख, तरुण उद्योजक संतोष वसंत शिंदे (वय ४६, रा.गांधीनगर) यांनी पत्नी तेजस्विनी (३६) व गुलगा अर्जुन (१४) याला विष पाजले आणि स्वतः विष पिऊन चाकूने त्यांचा व आपला गळा चिरून घेत बेडरूममध्ये आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

    गडहिंग्लजमधीलच माजी नगरसेविकेने शिंदे यांच्याविरुद्ध एप्रिलमध्ये बेळगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न ते करीत होते. परंतु मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी होती. प्रतिकूल परिस्थितीत शाखेची पदवी घेतलेल्या संतोष यांनी दहा वर्षांपूर्वी हसूरचंपू येथे अर्जुन रिफायनरी नावाने खाद्यतेल निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. पुणे, मुंबईसह कोकणातही त्यांच्या खाद्यतेलाला मोठी मागणी होती.

    घटनास्थळी पोलिसांना डायरी सापडली आहे. त्यात लिहिलेल्या ‘सुसाइड नोटमध्ये ‘त्या’ माजी नगरसेविकेसह चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा होती. त्यामुळे जमलेल्या लोकानी ‘त्या’ चौघांच्या अटकेच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. व्यापारी आणि व्यावसायिकांनीही दिवसभर बंद पाळला. विज्ञान बेकरी उत्पादनांचा प्रकल्प आणि अर्जुन फिटनेस नावाने अत्याधुनिक व्यायामशाळाही सुरू केली होती. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या त्यांच्या समूहामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला होता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक कुटुंबे विराज फूड्स नावाने सुमारे ४०० उघड्यावर पडली.

    #kolhaapur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.