Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दर्शनाच्या खुनाची धक्कादायक माहिती आली समोर
    क्राईम

    दर्शनाच्या खुनाची धक्कादायक माहिती आली समोर

    editor deskBy editor deskJune 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून बुधवारी रात्री अटक केली. दर्शनाचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्याने तिचा तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने वार करून खून केल्याची कबुली राहुल याने दिल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली दिली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हिंगणे येथील राहुल दत्तात्रेय हंडोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना दत्तू पवार (वय २६, रा. न-हे, मूळ कोपरगाव, जि. अहमदनगर) हिचा मृतदेह किल्ले राजगडच्या पायथ्याशी १८ जून रोजी आढळून आला होता. दर्शना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाली होती. तिचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोबाईल, बूट ,गॉगल, पर्स, ओढणी या वस्तूंवरून दर्शनाच्या मृतदेहाची ओळख पटली. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर आणि अंगावरील मारहाणीच्या जखमांमुळे दर्शनाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पुणे ग्रामीणच्या वेल्हे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाच पथकांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दर्शना ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील असून, राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र असून, लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होते. दोघे लग्न करणार होते.

    राहुल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह फूड डिलिव्हरी सर्विसमध्ये काम करीत होता. राहुल याने परीक्षेपूर्वी तिच्याशी ब्रेकअप केले होते. दर्शनाची लोकसेवा आयोगामार्फत वन अधिकारी (आरएफओ) पदावर निवड झाली. त्यानंतर राहुल पुन्हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी जमवल्याने राहुल अस्वस्थ होता. त्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे त्याने सांगितले. परंतु दर्शनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, दर्शना ही ९ जून रोजी पुण्यात एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. त्यानंतर ती सोमवारी (ता. १२) राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती. परंतु दर्शनाचा फोन लागत नसल्यामुळे दर्शनाचे वडील आणि नातेवाइकांनी किल्ले राजगडच्या परिसरात शोध घेतला. परंतु तिचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे वडिलांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दर्शना आणि राहुल दोघे सकाळी सव्वासहा वाजता किल्ले राजगडावर जाताना एकत्रित दिसत होते. परंतु परत येताना पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास तो एकटाच दिसून आला होता. त्यामुळे राहुल याच्यावर संशय बळावला होता. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि हत्यारे अद्याप जप्त केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.