Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिनेत्रीला मॅनेजरने लावला इतक्या लाखांचा चुना !
    राज्य

    अभिनेत्रीला मॅनेजरने लावला इतक्या लाखांचा चुना !

    editor deskBy editor deskJune 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा अॅनिमल हा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये फसवणूक करणारी दुसरी-तिसरी कुणीही व्यक्ती नसून हे तिच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. ही व्यक्ती तिची मॅनेजर आहे. रश्मिकाला याविषयी कळताच तिने मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकले.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून मॅनेजर रश्मिकाचं काम पाहत आहे. ती रश्मिकाच्या मागे लपूनछपून पैशांची चोरी करत होती. हे समजताच रश्मिकाला मोठा धक्का बसला आहे. मात्र तिला हे प्रकरण प्रकाशझोतात आणायचं नसल्याने ती शांत आहे.
    रश्मिका मंदाना सध्या रणबीर कपूरसोबत तिचा आगामी चित्रपट अॅनिमलमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा प्री-टीझर देखील रिलीज केला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. तसेच हा सिनेमा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांसोबतच रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडाशी तिचं नेहमीच नाव जोडलं जातं. मात्र या दोघांनी त्यावर कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.