Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तापी नदीपात्रात अंघोळ करताना तरुणाचा मृत्यू !
    क्राईम

    तापी नदीपात्रात अंघोळ करताना तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJune 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    धामणगाव जवळील तापी नदीपात्रामध्ये अंघोळ करत असताना अचानक फिट आल्याने रवींद्र आत्माराम कोळी (३०, रा. जैनाबाद) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जैनाबाद येथील रवींद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला.  रवींद्र हा एकटाच नदीपात्रामध्ये अंघोळ करीत होता. तर त्याचे दोन मित्र काही अंतरावर बसलेले होते. अचानक रवींद्र याला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला. यावेळी नदीपात्राच्या दुसऱ्या तिरावर असलेल्या काही जणांना तरुण बुडत असल्याचे दिसताच त्यांनी आरोळी मारुन त्याच्या मित्रांना रवींद्र बुडत असल्याचे सांगितले. मित्रांनी लागलीच रवींद्रला पाण्यातून बाहेर काढले. तोपर्यंत त्याच्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.