Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात महिलेवर चढविला रानडुकराने हल्ला
    क्राईम

    जळगावात महिलेवर चढविला रानडुकराने हल्ला

    editor deskBy editor deskMay 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील लांडोरखोरी वन उद्यानाकडून मोहाडी रोडलगत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता घडली. या हल्ल्यात महिलेच्या मांडीवर व हाताच्या बोटांवर रानडुकराने चावा घेतल्याने महिला जखमी झाली असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असलेल्या वंदना चंद्रकांत जगताप असे जखमी महिलेचे नाव आहे. वंदना जगताप व त्यांचे पती चंद्रकांत जगताप गेल्या दोन वर्षांपासून लांडोरखोरी रस्त्यालगत दररोज मॉर्निंग वॉकला जातात. मंगळवारी दोन्ही जण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले. लांडोरखोरी जवळच अचानक जगताप दाम्पत्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यात चंद्रकांत जगताप दूर फेकले गेले, मात्र वंदना जगताप या डुकरासमोर आल्याने डुकराने त्यांच्यावर हल्ला केला. इतरांनी रानडुकराला हुसकावले, त्यामुळे सुदैवाने वंदना जगताप यांचा जीव वाचला. तातडीने वंदना यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.