Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्दैवी घटना; सुसाईड नोट लिहून तरुणाने गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा..!
    क्राईम

    दुर्दैवी घटना; सुसाईड नोट लिहून तरुणाने गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा..!

    editor deskBy editor deskMay 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आणखी कोणाला त्रास नाही देणार अशा आशयाची सुसाईड नोट लिहून तरुणाने आपली जीवन यात्रा संपविण्याची जळगावला दुर्दैवी घटना शिव कॉलनी परिसरात बुधवारी घडली. अक्षय विलास सुर्यवंशी (वय-२६ वर्ष, रा. शिवकॉलनी बसस्टॉप जवळ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

    जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात अक्षय सुर्यवंशी हा तरुण परिवारासह वास्तव्याला होता. खासगी कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी रात्री १० वाजता तो जेवण करून झोपला, मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. आई अक्षयला उठवण्यासाठी गेली असता त्याने आत्महत्या केल्याचे दिसले. अक्षयचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला मृतदेह पाहून त्याच्या आईचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्यानंतर घरातील मोठ्या भावानेही घटनास्थळी धाव घेतली व त्यानेही आक्रोश केला.

    अशी आहे सुसाईड नोट
    अक्षयने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘शिक्षण झालं, पण घरच्यांच्या अपेक्षा, स्वप्न पूर्ण नाही करु शकलो. ओझं झालोय मी, अजून त्रास नाही देऊ शकत, म्हणून मी जातोय, कोणाला जबाबदार धरू नये” अशा आशयाची सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.