Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नूतन मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या वादातून भोईटेंसह इतरांवर ‘मकोका’ !
    क्राईम

    नूतन मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या वादातून भोईटेंसह इतरांवर ‘मकोका’ !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मराठा विद्याप्रसारक मंडळातील वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमिवर तानाजी भोईटे यांच्यासह त्यांच्या गटातील नऊ जणांवर ‘महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ कायद्याच्या अंतर्गत कलम वाढविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

    मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या वादातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक फिर्याद ऍड. विजय भास्कर पाटील यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती. यात संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी दबाव टाकून ऍड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात २९ संशयित असून त्यापैकी नऊ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच मकोकाप्रमाणे कलम वाढवण्यात आले आहे.

    विजय भास्कर पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संस्था ताब्यात घेण्यासाठी भोईटे गटातील सदस्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन, सुनील झंवर, रामेश्वर नाईक यांच्या मदतीने कागदपत्रे देण्याचा बहाणा करून जानेवारी २०१८मध्ये त्यांना पुण्यात बोलावून धमकावले होते. पुण्यातील एका फ्लॅटमध्ये विवस्त्र करून बांधले. मारहाण केली. आठ दिवसांत संचालकांचे राजीनामे नीलेश भोईटेंकडे देण्याची धमकी दिली होती.

    दरम्यान, यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर अपर पोलिस आयुक्त (पुणे शहर) यांनी यातील नऊ संशयितांच्या विरुद्ध मकोका कायद्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी कलमांत वाढ केली आहे. यामध्ये तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गोकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भोईटे व शिवाजी केशव भोईटे या नऊ जणांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.