Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
    क्राईम

    ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

    editor deskBy editor deskMay 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    एका ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी करुन तिचा हात पकडून विनयभंग केला आहे. आरोपी सदस्य एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या महिलेला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे. या प्रकरणी त्या ग्रामपंचायत सदस्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना पुण्यात घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गुलाब निकाळजे (रा. कोरेगाव) असे आरोपी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. हा सगळी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व 17 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    घटनेच्या वेळी फिर्यादी या काम करुन घरी जात असताना सचिन निकाळजे याने चारचाकी गाडीतून पाठलाग करुन त्यांना थांबविले. त्यांचा हात पकडून तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस,असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले. यानंतर त्याने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली. यानंतर फिर्यादी महिलेने त्याला धक्का दिला. यानंतर आरोपीने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर फिर्यादी महिला खूप घाबरली. तिने या घटनेची माहिती आपल्या पतीला दिली. यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे (Sub-Inspector of Police Dhaygude) हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.