Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एलसीबीची कारवाई : मोबाईल लांबविणाऱ्यास घेतले ताब्यात !
    क्राईम

    एलसीबीची कारवाई : मोबाईल लांबविणाऱ्यास घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskMay 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांच्या धूमस्टाइलने हातातून मोबाईल लांबविणाऱ्या एकास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून ताब्यात घेवून त्यास रामानंद पोलीस स्थानकाच्या ताब्यात दिले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या काही दिवसापासून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांच्या धूमस्टाइलने हातातून मोबाईल लांबविल्याच्या घटनेत वाढ होत होती. त्याच अनुषंगाने जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत शहरातील मोहाडी परीसारतील उमेश पार्क परिसरातून राहुल रानू देखनाळे (वय २४) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्याजवळून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्याला पुढील कार्यवाहीसाठी रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    मोबाईल चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक यांनी केल्या होत्या. मोहाडी गावाजवळील उमेश पार्क भागात राहणारा राहुल देखनाळे याच्याकडे चोरीचे मोबाईल असून, तो ते विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी उमेश पार्क भागामध्ये सापळा रचून राहुल याला अटक केली. झडतीत त्याच्या खिशामध्ये चोरीचे दोन मोबाईल मिळाले. त्याने साथीदाराच्या मदतीने एमआयडीसी व रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून धूमस्टाइलने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला करून पुढील अटक कार्यवाहीसाठी रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, संदीप सावळे, ईश्वर पाटील, उमेशगिरी गोसावी आदींनी केली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.