Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले जीवन !
    क्राईम

    जळगावात १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले जीवन !

    editor deskBy editor deskMay 15, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातील १९ वर्षीय तरुणाने आज दि १५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या घरात आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रीम कॉलनीती परिसरातील रहिवासी आकाश सुरेश शेरे (वय-१९) या तरुणाने आज सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.

    सुप्रीम कॉलनी परिसरात आकाश शेरे हा आपल्या आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत रहायला होता. एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून आकाश आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याने नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता आकाशाने आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी आंघोळ करण्यासाठी आला होता. दरम्यान त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा टपरीवर का आला नाही, त्यामुळे त्याची आई सविता यांनी घरी आल्या. घरात जाताच आकाशने छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच आईने एकच हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक व तरुणांनी एकच धाव घेऊन मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.