Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्याला जाणाऱ्या बस ३० फुट खोल पुलावरून कोसळली !
    क्राईम

    पुण्याला जाणाऱ्या बस ३० फुट खोल पुलावरून कोसळली !

    editor deskBy editor deskMay 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यातील प्रसिद्ध धामिक स्थळ असलेल्या शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात बुलडाण्याजवळ झाल्याचे कळते. पुण्याच्या दिशेनं निघालेली बस पैनगंगा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १ महिलेचा मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शेगाववरून पुण्याच्या दिशेला बस निघालेली होती. या अपघातामध्ये बसमधील १७ जन गभीर जखमी असून त्यातील एक महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत. बुलडाण्याच्या शेगाववरुन पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या प्रवासी बसला मंगळवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. स्वरा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला आहे. चिखली रोडवरील पेठजवळ ही घटना घडली. पेठ या गावाजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली.ही लक्झरी बस जवळपास 25 ते 30 फूट खोल कोसळली. अपघातामध्ये बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. जवळपास 25 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. या अपघातामध्ये एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पेठ येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.