Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात पोलिसांची मोठी कारवाई : साडेचार लाखांचा पानमसाला जप्त !
    क्राईम

    जळगावात पोलिसांची मोठी कारवाई : साडेचार लाखांचा पानमसाला जप्त !

    editor deskBy editor deskMay 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका गोडाऊनवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी धाड टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला साडेचार लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासो पवार यांना शुक्रवारी रात्री जळगाव- भुसावळ रस्त्यावरील एका दुचाकी शोरूमच्या मागील भागातील गोडावूनमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि तंबाखूचा माल साठवून ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांविरुध्द कारवाई केल्यानंतर गोडाऊनची झडती घेतली. त्यामध्ये १ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे पानमसाले ११४० पाकिटे आणि सुंगधित तंबाखूचेही ११४० पाकिटे, १ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे ७०० पाकिटे, १५ हजार ४०० रुपये किमतीचे व्ही-१ तंबाखूचे ७०० पाकिटे तसेच १ लाख २८ हजार ६४० रुपये किंमतीचे आरएमडी पानमसाल्याचे २६८ पाकिटे पोलिसांना मिळून आले. असा एकूण ४ लाख ५३ हजार ६४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

    त्यानुसार पवार यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिसांनी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास गोडाऊनवर धाड टाकली. त्याठिकाणी तीन जण मिळून आले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी त्यांची अमोल तुकाराम वनडोळे (२८, रा. शिरसोली प्र.बो.), विनायक शालिक कोळी (४७, रा. वाल्मिक नगर), भूषण तांबे (३८, रा. शिवाजीनगर) अशी नावे सांगितली. तिघांविरुध्द बेकायदेशीररित्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू बाळगल्याप्रकरणी भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६ (२) (१),२६ (२) (४), २७ (३) (डी), २८ (३) (ई), ५८,५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.