Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परराज्यातून येणारा लाखो रुपयाचा गुटखा अधिकारीनी पकडला !
    क्राईम

    परराज्यातून येणारा लाखो रुपयाचा गुटखा अधिकारीनी पकडला !

    editor deskBy editor deskApril 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू यांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. यामध्ये २६ लाख ५२ हजार ५२० रुपयांचा गुटखा व नऊ लाख रुपयांची दोन वाहने, असा एकूण ३५ लाख ५२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्ह्यात सुरू असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रस्त्यावर पूर्णा नदीच्या काठावर सापळा रचला होता. त्यावेळी प्रतिबंधित अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरून वाहन क्रमांक एमएच २०, ईएल ५८४९ व एमएच २० ईएल १७३७ या वाहनांना पथकाने थांबविले. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये राज्यात उत्पादन, साठा, वितरण, विक्री व वाहतुकीकरिता बंदी असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला. ही वाहने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक, क्लीनर, वाहनमालक व साठा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राम भरकड यांनी केली. मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.