Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी : शेजारच्यांविरोधात गुन्हा !
    क्राईम

    जळगावातील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी : शेजारच्यांविरोधात गुन्हा !

    editor deskBy editor deskApril 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात ट्रॅफिक वॉर्डन तरुणाने शेजारचांच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली होती. या प्रकरणी शेजारच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश एकनाथ ठाकूर (वय ३७) या तरुणाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २६ एप्रिल बुधवार रोजी दुपारी घडल्यानंतर गुरूवारी रात्री उशीरा पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. घराशेजारील किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल, रूखमा रमेश तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांनी वेळावेळी मनासिक त्रास दिला तसेच न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेण्यासाठी वारंवार धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून उमेश याने सुसाईड नोट आत्महत्या केली होती. २६ एप्रिल रोजी दुपारी हा प्रकार समोर आल्यानंतर यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर २७ एप्रिल रोजी रात्री उशीरा मयत उमेश ठाकूरची पत्नी हेमलता ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल, रूखमा रमेश तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल (सर्व रा.रामेश्वर कॉलनी) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.