Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय माजी विद्यार्थीसह शिक्षकेतर यांचा स्नेह मेळावा !
    जळगाव

    पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय माजी विद्यार्थीसह शिक्षकेतर यांचा स्नेह मेळावा !

    editor deskBy editor deskApril 28, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकुलखेडा : प्रतिनिधी 

    दिनांक २३  रोजी पंडित जवाहरलाल नेहरू एसएससी बॅच 2002 चे माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न झाला सदर मेळाव्याच्या कार्यक्रमाला श्री. अनिल रामदास पाटील अध्यक्ष तर डॉ. पराग पाटील उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली सदर बॅचचे विद्यार्थी तब्बल 21 वर्षानंतर स्नेहसंमेलन मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र जमले होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद एकमेकांना भेटून गगनात मावत नव्हता अशी स्थिती झालेली होती .

    यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून  श्री. अनिल रामदास पाटील (अध्यक्ष) , डॉ पराग पाटील( उपाध्यक्ष),श्री. हेमंतकुमार आत्माराम महाजन(चेअरमन), श्री. घनश्याम विश्वनाथ पाटील. (कार्यकारणी सदस्य ), श्री सुनिल दगडू महाजन(माजी सभापती), श्री. अतुल वासुदेव महाजन – (शालेय समिती सदस्य), श्री. योगराज सुपडू बडगुजर – (माजी सैनिक),श्री. लक्ष्मण उत्तम कोळी (सरपंच), श्री. योगेश दगडू पाटील (उपसरपंच), कै.शिवाजीराव महारू पाटील सर (कै. माजी मुख्याध्यापक यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य), कै. एम. एस. पाटील सर.( कै. माजी शिक्षक यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य), कै. जे. डी. पाटील सर.( कै. माजी शिक्षक यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य ),श्री. एम.डब्ल्यू. पाटील सर(माजी शिक्षक),श्री. आर.व्ही.चौधरी सर(माजी शिक्षक),श्री. के.डी.सोनवणे सर.( माजी शिक्षक) -,श्री. डी.जी.महाजन सर(माजी शिक्षक),श्री. बी.व्ही.चौधरी सर(माजी शिक्षक)-, श्री. एम.एच.शिरसाठ सर(माजी शिक्षक)-,श्री पी.एस.पाटील सर(मुख्याध्यापक)-
    , श्री. रविंद्र आत्माराम सोनवणे सर(मुख्याध्यापक)-, श्रीमती के.पी.पाटील मॅडम (माजी शिक्षिका)-,गं.भा.सिंधुबाई पांडुरंग पाटील मॅडम(माजी शिक्षिका)- श्रीमती अनिता प्रकाश महाजन (मुख्याध्यापिका), श्री. माधव राघो चौधरी(माजी शिपाई), श्री. अशोक जगन्नाथ पाटील.,श्री. चंद्रकांत मोतीराम पाटील( माजी क्लर्क). श्री. अविनाश नाना पाटील(माजी शिपाई), गं.भा.प्रमिलाबाई सिताराम चौधरी (माजी शिपाई)

    वरील सर्व अतिथी यांनी कार्यक्रमास हजेरी लावली सर्व अतिथी यांना शाल व बुके देऊन सत्कार केला माजी शिक्षक व कै. माजी शिक्षक यांच्या कुटुंबातील प्रमुख यांना शाल, बुके व विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचे सन्मानपत्र देण्यात आले आणि अतिशय उत्साह पूर्ण असा हा स्नेहसंमेलनाचा मेळावा पार पाडण्यात आला. जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी श्री. रामेश्वर भबुत धनगर, श्रीमती प्रतिज्ञा गोपीचंद सोनवणे, श्री. जितेंद्र भास्कर सोनार, श्री. अतुल नारायण महाजन, श्री सोपान भिमराव मोरे या विद्यार्थ्यांनी आपले जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले मनोगत व्यक्त केले तर काहींनी अक्षरशः लहानपणीचे अनुभव सांगून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले.
    आपणही या शाळेचे काही देणे लागतो या कृतज्ञतेच्या भावनेने सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींच्या हस्ते शाळेला दोन एल. ई.डी. टीव्ही संच भेट दिले त्याबद्दल शाळेने सर्व माजी विद्यार्थ्यांना आभार पत्र दिले तसेच माजी विद्यार्थी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष श्री. सोपान भीमराव मोरे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमा फोटो शाळेला भेट म्हणून दिला.शेवटी माजी विद्यार्थ्यांचे गुरुवर्य श्री आर. ए. सोनवणे यांनी या विद्यार्थ्यांना उद्देशून ही बॅच म्हणजे आमची गुणाची खाण अशी बॅच असून अतिशय यशस्वी अशी ह्या बॅच मधले विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या असे सांगून त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून प्रेरणा देण्याचं प्रयत्न केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आर. के. पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. पाटील सर यांनी केले. सदर मेळाव्याची कल्पना श्री रामेश्वर भबुत धनगर आणि श्री रफिक सलाउद्दीन पिंजारी यांनी मांडली सदर कार्यक्रमासाठी श्री. अतुल प्रकाश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले तरी सदर स्नेहसंमेलन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय एसएससी बॅच 2002 चे सर्व माजी विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘तू मला खुन्नस का दिली?’ म्हणत एकाला बेदम मारहाण !

    March 18, 2026

    ‘गुड बाय’ स्टोरीनंतर धरणगांवच्या विद्यार्थ्याचा जळगावात अंत !

    March 18, 2026

    पोलिसांच्या पेट्रोल पंपातच कोट्यवधींचा घोटाळा; उपनिरीक्षकासह मुलगा न्यायालयीन कोठडीत !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.