Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मी बदला घेणार ; ठाकरेंचा थेट शिंदेंना इशारा !
    राजकारण

    मी बदला घेणार ; ठाकरेंचा थेट शिंदेंना इशारा !

    editor deskBy editor deskApril 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा ठाकरे गट व शिंदे गट आमने समाने येत आरोप प्रत्यारोप करू लागल्याने राज्यातील जनतेचे लक्ष वेधले गेले आहे. काम’गार’ करणारे हे सरकार आहे. राज्याचे काय होणार? मुख्यमंत्री असताना मला जे करता आले ते मी केले.
    परंतु ज्या पद्धतीने पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले, त्याचा बदला मी घेणारच, जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे गटाला गुरुवारी दिला. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवताहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

    भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेनेला ५६ वर्षे झाली, भारतीय कामगार सेनेला ५५ वर्षे झाली तरीही ती अजून तरुण आहे. त्या काळी युनियन तुझी का माझी यावरून मारामारी होत असे. आता सरकारच युनियन संपवायला निघाले आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. आपले दिवस गेलेत असे म्हणूच शकत नाही. ते आणायचेत.

    सामान्य माणसे मतदानातून जोडे मारतील – एकनाथ शिंदे
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात. हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, असे त्यांनी म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.