Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात बदमाश सायकल चोरटा फसला !
    क्राईम

    ब्रेकिंग : रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात बदमाश सायकल चोरटा फसला !

    editor deskBy editor deskApril 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यापासून सायकल चोरीचे गुन्हे घडले होते. त्या गुन्हाची उकल करीत असतांना रामानंद नगर पोलिसांना यश आले असून यातील एका संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ३१ सायकली देखील जप्त करण्यात आल्या आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश पार्क शिवकॉलनी परिसरातील गिरीश गोविंदा खैरकर (वय-२२) या तरूणाची सायकल २१ डिसेंबर २०२२ रोजी सायकल चोरी गेली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह इतर ठिकठिकाणी सायकली चोरीचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिले होते. त्यानुसार रामांनद नगर पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. गोपनिय माहितीनुसार जयेश अशोक राजपूत (वय-२२) रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव याने या सायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी संशयित आरोपी जयेश याला २१ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीच्या एकुण ३१ सायकली काढून दिल्या. संशयित आरोपीवर पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.
    नमुद गुन्हयाचा रामानंद पोलीस स्थानकाचे पोनि शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोह/ सुशिल चौधरी व विजय खैरे हे करीत असून, गुन्हयाचे तपास पथकात पोह/संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पोना / रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दिपक वंजारी, आदींनी सहभाग घेतला होता. मागील कालावधीत ज्या नागरीकांची सायकल चोरीस गेली आहे. त्यांनी रामानंद नगर पोलीसांशी लागलीच संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.