Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजप प्रवेशावर अजित पवार पहिल्यांदाच उघड बोलले !
    राजकारण

    भाजप प्रवेशावर अजित पवार पहिल्यांदाच उघड बोलले !

    editor deskBy editor deskApril 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपात जाणार या चर्चेवर जरी प्रतिक्रिया आल्या असल्या तरी अजित पवार मात्र ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी याच चर्चेवर बोलत असतांना दिसून येत आहे त्यांनी एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांसंदर्भात स्पष्टपणे मत मांडले.

    अजित पवार म्हणाले की, 1967 पासून शरद पवार साहेबांवर बारामतीने विश्वास ठेवला आहे. शरद पवार साहेबांनी माझ्यावर 1990 पासून माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही. कोणी काय डोक्यात वेगळा घालायचं प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका, असे स्पष्ट ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांसंदर्भात स्पष्ट म्हणाले. बारामतीचं वातावरण सुरक्षित राहिलं पाहिजे, हे महत्वाचे आहे, असे अजित पवार यांनी म्हटलंय.

    मी आमदार असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायला सोपं जातं. पालखी मार्ग अतिशय मोठा झाला आहे. पुढचा राहिलेला आपण चारपदरी करतोय. बारामती शहराचा विकास वेगाने होत आहे. यामध्ये नवीन नवीन दुकानं येताय. बारामतीत वेगळी कन्सेप्ट तयार झाली आहे. जे काही करता येईल ते आपण करु या. निधी आणायला मी खंबीर आहे. बारामतीकरांनी 67 पासून साहेबांवर विश्वास टाकला. त्या विश्वासाला तडे जाऊ देणार नाही

    बारामतीचा विकास होत आहे. बारामतीकरांनी आपल्या जमिनी विकू नका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. बारामतीचा विकास होतानात लोकांनीही आपली जबाबदारी पाळली पाहिजे. इतरत्र कचरा टाकला नाही पाहिजे. विकास झाल्यामुळे जमिनीचा दर वाढत आहे. परंतु आपल्या जमिनी विकू नका.जेवढा नोकऱ्या देता येईल तेवढं करतो. छोटामोठा व्यवसाय केला पाहिजे. बाहेरून येऊन लोकं करतात मात्र बारामतीकरांना का जमतं नाही. जेवढं काही करता येईल ते मी रात्रंदिवस काम करतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.