Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » केद्रीय मंत्री मंडळात होणार मोठे फेरबदल !
    राजकारण

    केद्रीय मंत्री मंडळात होणार मोठे फेरबदल !

    editor deskBy editor deskApril 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्त संस्था 

    सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीपूर्वी मे महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात १२ पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन हा फेरबदल केला जाईल. ऑगस्ट २०२२ पासून पुढे ढकलला फेरबदल अखेर पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.

    सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणाऱ्यांसाठी वयाची गाइडलाइन तयार होत आहे. ज्यांचे वय ६५ ते ७०च्या आसपास आहे, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. कामगिरीच्या आधारावरही काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. काही जणांवर २०२४ मधील निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नव्या मंत्र्यांचा आधार निखळपणे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील गरज पाहून असेल. पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या राज्यांतील नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

    २०२४ च्या निवडणुका लक्षात घेता बिहार व महाराष्ट्रातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. यात बिहारमधून चिराग पासवान, आरसीपी सिंह यांच्या नावांची तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन केंद्रीय मंत्री केले जाण्याची चर्चा सुरू आहे. एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री पदे शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जाऊ शकतात.

    मंत्र्यांची खातीही बदलणार 
    सूत्रांनी सांगितले की, सुमारे २० केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतो. सध्या अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे एकपेक्षा जास्त मंत्रालयांचे कामकाज आहे. यात अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, भूपेंद्र यादव, मनसुख मंडविया, धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. यांच्याकडे सध्या एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी आहे. यापैकी अनेक मंत्री आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून, यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, २०२४ मध्ये मोदी सरकारच्या राज्यसभेतील काही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनाही लोकसभा निवडणूक लढण्याचे निर्देश आतापासून दिले आहेत. यात धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव यांच्यासारखे असे सांगितले जाऊ शकते. यातील काही नेत्यांनी तर आपल्यासाठी लोकसभा मतदारसंघाचा शोधही पूर्ण केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.