Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळातील ‘तो’ गोळीबार पूर्ववैमनस्यातून !
    क्राईम

    भुसावळातील ‘तो’ गोळीबार पूर्ववैमनस्यातून !

    editor deskBy editor deskApril 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ  : प्रतिनिधी 

    शहरातील साकरी फेकरी फाट्यानजीक शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोनजण जखमी झाले होते. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तीनही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

    साकरी फाट्यानजीक शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली होती. यात अक्षय रतन सोनवणे (२६) आणि मंगेश अंबादास काळे (२५, दोन्ही रा. भुसावळ) हे दोनजण जखमी झाले आहेत. अक्षयच्या पोटात तर मंगेशच्या छातीत गोळी लागली आहे. या दोघांवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत भुसावळ तालुका पोलिसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तसेच खडका गावात राहणारे चार जण कारने जेवणासाठी वरणगावकडे जात होते. साकरी फेकरी रस्त्याने ते उड्डाणपुलाकडे निघाले होते. त्याचवेळी मागून आलेल्या तीन जणांनी कारसमोर मोटारसायकल आडवी लावली. आपली कार कुणी अडविली हे पाहण्यासाठी अक्षय व मंगेश कारच्या बाहेर आला. त्याचक्षणी मोटारसायकल स्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि ते पसार झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.