Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी घेतली हातात दंडुका !
    राज्य

    गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी घेतली हातात दंडुका !

    editor deskBy editor deskApril 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात तरुणाईच्या मनावर राज्य करणारी गौतमी पाटीलची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. ती म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील तिचा कार्यक्रम म्हणलं की राडा तर होणारच. गावागावात तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. कधीकधी गर्दी आवाक्याच्या बाहेर जाते आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. मात्र जुन्नर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. गौतमीचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा म्हणून गावातील महिलाच हातात काठ्या घेऊन समोरच्या रांगेत बसल्या.

    जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेदरम्यान गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, गोंधळ तर होणारच. पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेजच्या बाजूलाच गावातील महिला हातात काठ्या घेऊन बसल्या. त्यामुळे सर्व तरुणांनी शांतपणे मागे बसूनच कार्यक्रमाचा आनंद घेतला. कोणीही गोंधळ करु नये म्हणून आदिवासी ठाकर समाजाच्या महिलांनी आणि गावातील इतर महिलांनीच सुरक्षेची जबाबदारी चोख पार पाडली. याशिवाय गौतमीचे खाजगी सुरक्षारक्षक, बाऊन्सर्स आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होताच. हातात दंडुका घेतलेल्या महिलांच्या धाकाने का होईना कार्यक्रम सुरळीत पार पडला. गौतमीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच हा असा प्रकार बघायला मिळाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.