Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात फळविक्रेत्याला मारहाण करीत चाकू लावून लुटलं !
    अमळनेर

    अमळनेरात फळविक्रेत्याला मारहाण करीत चाकू लावून लुटलं !

    editor deskBy editor deskApril 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका फळविक्रेत्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. तसेच गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळ असलेल्या फळविक्रीचे पैसे हिसकावून नेणाऱ्या एकावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये फळविक्रीचे दुकान ज्ञानेश्वर रतन साटोटे यांचे आहे. दि ७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनोज ऊर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे (राजारामनगर) हा रिक्षा घेऊन दुकानात आला व शिवीगाळ करू लागला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व कमरेला असलेला चाकू काढून गळ्याला लावत जिवे मारण्याची धमकी दिली. फळविक्रीचे जमा झालेले दीड हजार रुपये शर्टच्या वरच्या खिशातून काढून घेतल्याने त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.