Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » झुकेगा नही साला म्हणत अल्लू अर्जुन पुन्हा येतोय !
    राज्य

    झुकेगा नही साला म्हणत अल्लू अर्जुन पुन्हा येतोय !

    editor deskBy editor deskMarch 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशभर पहिल्याच दिवशी आपल्या डायलॉगबाजीमुळे चर्चेत आलेला पुष्पा चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. झुकेगा नही साला म्हणत अल्लू अर्जुनने केलेली हटके भूमिका पाहून तर चाहते त्याच्या प्रेमात पडले. आता हाच ‘पुष्पा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो, याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता फार वाट पाहावी लागणार नाहीये. कारण ‘पुष्पा २’ चा पहिले पोस्टर समोर आले आहे.

    अल्लू अर्जुनच्या अभिनयाने सजलेला ‘पुष्पा २’ म्हणजेच ‘पुष्पा: द रुल’ डिसेंबर महिन्यात धमाका करायला सज्ज आहे. पुन्हा एकदा अल्लू अर्जुनचा दबदबा यामुळे अनुभवायला मिळणार आहे. पुष्पाभाऊच्या नव्या अवतारात नेमकं काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चाहते पुढची कथा नेमकी काय असेल याचा अंदाज लावत असतानाच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात पुष्पा रक्तचंदनच्या लाकडाचा व्यवसाय करताना दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टरमध्येही कापलेल्या झाडाचं खोड दिसत आहे. त्यावर पुष्पाची कुऱ्हाड दिसत आहे. एका बाजूला त्याची बंदूकही दिसत आहे. महत्वाचं म्हणजे या खोडावर पुष्पाची सावली आहे. त्याचं चित्र दिसत आहे. त्यात लिहिलंय, ‘पुष्पा इज बॅक’. सोबतच चित्रपटाचे पुढचे पोस्टर आणि टीझर ८ एप्रिल पासून प्रेक्षकांसमोर येणार आहेत असंही लिहिलेलं आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून प्रेक्षक आणखी आनंदले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.