Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात डंपरने दिली कारला धडक ; तीन जखमी !
    क्राईम

    जळगावात डंपरने दिली कारला धडक ; तीन जखमी !

    editor deskBy editor deskMarch 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील मुख्य टॉवर चौकात शुक्रवारी भरधाव डंपरने कारला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तिघे जखमी झाल्याची नोंद जळगाव शहर पोलिसात करण्यात आली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवार, 24 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एम.एच.19 बी.जे.7917) ही नेहरू पुतळ्याकडून टॉवर चौकात येत असतांना त्याच वेळी शिवाजी नगरकडून चित्रा चौकात जात असलेला डंपर (एम.एच.19 झेड.4100) ने कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील शिक्षिका सविता अशोक सानेवणे (40, रामानंद नगर, जळगाव) आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (42) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. यावेळी जवळच असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले. तिघांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघातानंतर डंपर चालक हा डंपर सोडून पसार झाला असून डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.